महाराष्ट्र

मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्याच्या मराठावाडा विभाग प्रमुख पदी अर्शद बागवान यांची निवड…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे
संस्थापक अध्यक्ष रशीदभाई शेख यांच्या सहमतीने आणि मराठवाडा विभागातील असंख्य कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्याच्या मराठावाडा विभाग प्रमुख पदी जालना येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अर्शद बागवान यांची निवड एका प्रसिद्धी पत्रका द्वारे काढण्यात आल्याची माहिती दस्तुरखुद रशिदभाई शेख यांनी दिली…

अर्शद बागवान यांचे वडील अ रज्जाक बागवान यांनी दै जालना टाइम्स च्या माध्यमातून जी सामाजिक चळवळ राबवली त्या चळवळीला यशो शिखरावर नेण्याचे काम अर्शद बागवान यांनी केल्यानेच त्यांची निवड मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्याच्या मराठावाडा विभाग प्रमुख पदी केल्याचे हि रशिद भाई शेख यांनी सांगितले..

अर्शद बागवान यांची निवड करण्यात आल्याची माहिती मराठवाडा विभागातील कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला…
टाइम्स 9 शी बोलताना अध्यक्ष रशीदभाई शेख असे हि म्हणाले की,भविष्यात मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविणार असुन मुस्लिम समाजातील जे कार्यकर्ते इमाने इतबारे संघटनेच्या कार्यप्रणाली मध्ये काम करु इच्छित असतील त्यांनी आपल्या बायोडाटा सह मुस्लिम समन्वय समिती च्या कार्यालयाशी संपर्क साधावा आम्हीं त्यांना समिती मध्ये सामावून घेऊ असे आवाहन हि रशिदभाई शेख यांनी केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button