शरद पवार साहेबांनी माढा विधान सभेसाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर करावी… दलित – मुस्लिम चळवळीतील कार्यकर्ते लालासाहेब अडगळे आणि आमीर मोहोळकर यांनी केली मागणी…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज चे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी माढा विधानसभा मतदार संघातून जाहीर करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती अकलूज येथील दलित मुस्लिम चळवळीतील युवक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे आणि आमीर मोहोळकर यांनी दिली…
पुढे बोलताना ते दोघे असे हि म्हणाले की,आम्हीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांची भेट घेऊन एका निवेदनद्वारे हि मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले…
त्याचे झाले असे की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांची भेट आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी नुकतीच घेतली असता त्या भेटीत नेमकं काय घडलं याचा vdo सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत असुन संबंधित vdo मध्ये दस्तुरखुद्द शरदचंद्र पवार साहेब धनराज शिंदे यांना उद्देशून असे म्हणत आहेत की,”मी माढा विधानसभा मतदार संघा करिता जो उमेदवार देईन तोच उमेदवार निवडून येणार आहे”…
शरदचंद्र पवार साहेब यांच्या या विधानाला समोर बसलेले धनराज शिंदे ह्यांनी हि सकारात्मकता दर्शविली असुन “100 टक्के खरंय” असे म्हणत पवार साहेबांच्या विधानाशी एकसंघता दाखवली आहे,याचा एक प्रकारे असा हि अर्थ होतो की,भविष्यात धनराज शिंदे हे आपले चुलते आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात जाऊन पवार साहेब जो उमेदवार माढा विधानसभे करिता देतील त्या उमेदवाराचे काम इमाने इतबारे करतील असे सध्या तरी वाटत आहे…

मागिल दहा अकरा वर्षे सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा झालेला छळ आणि कपटी राजकीय डावपेच लक्षात घेता सोलापूर जिल्ह्यातील जनता आता वेगळ्याच मुड मध्ये आहे.तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने जास्तीची चाचपणी करु नये आणि माढा विधानसभा मतदार संघासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचेच नाव जाहीर करावे…
तसेच सोलापूर जिल्ह्यात आपल्या पक्षाचे एकमेव खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नाड्या कशा प्रकारे आवळलेल्या आहेत ते संबंध महाराष्ट्राने उघडपणे पाहिलेलं आहे,तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी च्या सर्वच जागा येणार्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मोहिते पाटील परिवारातील युवकावर जबाबदारी देऊन टाकावी,जेणेकरून आमच्या सारखे सामान्य कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागतील…
ज्या मोहिते पाटील घराण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाला ऐन लोकसभेत जो “दोस्ती” चा हात दिला याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्मळ मनाने परत फेड करावी आणि लोकसभे सारखा दुसरा करिश्मा सोलापूर जिल्ह्यात बघण्यासाठी सज्ज रहावे…
लोकसभा निवडणुकी वेळी राष्ट्रवादीच्या पडत्या काळात मोहिते पाटील यांची साथ मिळाल्याने जो रिझल्ट शेजारील बारामती,सोलापूर,धाराशिव आणि नगर जिल्ह्यात मिळाला त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता हि आता नाकारता येत नाही…
तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात सबंध माढा तालुक्याची जबाबदारी लीलया पेलणारे आणि कर्तृत्व,वक्तृत्व,नेतृत्व या स्व गुणाच्या आधारावर लोकसभेला माढा तालुक्यातून निर्णायक आघाडी मिळवून देणारे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी बिनधास्त पणे जाहीर करावी…
पुढे बोलताना ते दोघे असे हि म्हणाले की,सोलापूर जिल्ह्यात मागील काही काळात घडलेलया राजकीय घडामोडींचा विचार लक्षात ठेऊन आम्हीं रणनीती आखत असुन,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने (शरदचंद्र पवार गट) वेळ न घालवता एक एक तालुक्यातील प्रचार यंत्रणा सज्ज करत प्रथम माढा विधानसभा मतदार संघाचीच उमेदवारी घोषित करावी आणि शिवतेज सिंह मोहिते पाटील यांना पक्ष प्रवाहात हि सामावून घ्यावे,असे आवाहन हि लालासाहेब अडगळे आणि आमीर मोहोळकर यांनी शेवटी केले…



