मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी सलीम मुलाणी…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे
संस्थापक अध्यक्ष रशीदभाई शेख यांच्या सहमतीने आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून मुस्लिम समन्वय समिती च्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी फोंडशिरस येथील युवक कार्यकर्ते सलीमभाई मुलाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती समितीच्या प्रवक्त्याने दिली

टाइम्स 9 शी बोलताना अध्यक्ष रशीदभाई शेख असे हि म्हणाले की,भविष्यात मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविणार असुन मुस्लिम समाजातील जे कार्यकर्ते इमाने इतबारे संघटनेच्या कार्यप्रणाली मध्ये काम करु इच्छित असतील त्यांनी आपल्या बायोडाटा सह मुस्लिम समन्वय समिती च्या कार्यालयाशी संपर्क साधावा आम्हीं त्यांना समिती मध्ये सामावून घेऊ…

या वेळी सलीमभाई मुलाणी यांची जिल्हा अध्यक्ष पदी वर्णी लागल्याने मुस्लिम समाजातील अनेक युवकांनी आनंद व्यक्त केला…



