रेल्वे फाटक बंदच्या विरोधात सफाळे विकास कृती समिती आणि सफाळे व्यापारी असोसिएशनच्या वतीने जनआक्रोश आंदोलन.. सफाळे कडकडीत बंद …?

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
पश्चिम रेल्वेने सफाळे रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करून पर्यायी पूल उपलब्ध न करून दिल्यामुळे सफाळे विकास कृती समिती व सफाळे व्यापारी असोसिएशन आणि या भागातील ग्रामस्थांनी शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी जन आक्रोश आंदोलन पुकारले होते.
यामुळे सफाळे परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी सफाळे पोलिस व रेल्वे पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली होती.या आंदोलनाला सफाळे भागातील ग्रामस्थ व महिला शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग व्यावसायिक भाजीविक्रेते प्रवासी वर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

हे आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडले असून यावेळी या आंदोलनाला पालघर उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी भेट दिल्यावर त्यांच्या समक्ष सफाळे रेल्वे फाटक बंद केल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. हे निर्देशनास आणून देऊन रेल्वे प्रशासनाने 31 मार्च 2025 रोजी बंद केलेल्या रेल्वे फाटकाच्या बाजूने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा तो पर्यंत रेल्वे फाटक बंद करू नये असे निवेदन दिले.

व यावर रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा न काढल्यास उग्र आंदोलन करण्याचा सक्त इशारा रेल्वे प्रशासनाला सफाळे विकास कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे .



