नेरले येथील जलजीवन विहिरीच्या कामांमध्ये सात लाख रुपयाचा भ्रष्टाचार अधिकारी, कर्मचारी तसेच ठेकेदार यांनी संगतमताने केली रक्कम हडप.माजी सरपंच औदुंबर राजे भोसले यांनी दिला उपोषणाचा इशारा

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
नेरले येथील जल जीवन विहिरीचे कामामध्ये विहिरीचे काम न करता चक्क सात लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नेरले येथील माजी सरपंच औदुंबर राजे भोसले यांनी यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे निवेदनात म्हटले आहे की विहिरीचे कोणत्याही पद्धतीचे काम न करता अपहार केलेल्या निधीची कागदपत्रे न दिल्यामुळे उपोषणाचा इशारा नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिला आहे.

नेरले तालुका करमाळा येथे जलजीवनअंतर्गत 95 लाख रुपये निधी मंजूर आहे .त्या निधीमधून विहिरीचे काम न करताच जुनीच पाणीपुरवठाची विहीर दाखवून सुमारे सात लाख रुपये निधी अधिकारी ,कर्मचारी ,ठेकेदार यांनी संगणमताने उचलून अपहार केला. त्याविषयीची मागणी केली कागदपत्रे दोन महिन्यापासून देत नसल्यामुळे कागदपत्रे दिनांक 14/ 6/ 2024 पर्यंत न दिल्यास आम्ही ग्रामस्थ ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय करमाळा येथे कागदपत्रे मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार असा इशारा दिला आहे.
निवेदन माननीय तहसीलदार,,माननीय पोलीस निरीक्षक करमाळा ,गटविकास अधिकारी करमाळा व अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा करमाळा यांना ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे दिले आहे त्या निवेदनावर अजित जयहरी सावंत दादासाहेब सौदागर दौंड अभिमान जगताप सरपंच रावसाहेब गलांडे युवराज महाडिक इत्यादी ग्रामस्थांच्या सह्या आहेत



