संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा विठ्ठलवाडी – जलसार परिसरात वृक्षारोपण…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
ONENESS वन’ अभियानांतर्गत पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेला असलेल्या परिसरात संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन आणि ग्रुप ग्रामपंचायत मांडे- विठ्ठलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस तसेच नागपंचमी या तिहेरी विशेष शुभ दिवसाचे औचित्य साधून मांडे- विठ्ठलवाडी क्रिकेट मैदान, डोंगरी परिसरात व जलसार स्मशानभूमी परिसरात 500 वृक्षाची लागवड करण्यात आली.

सकाळच्या सत्रात उदघाटक कामनीष राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की वृक्षा प्रमाणेच निरंकारी मंडळ हे परोपकारी सेवाभावी कार्य करीत असून अनेक सामाजिक उपक्रमातून मानवाला जागृती प्रदान करीत आहे. या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत मांडे- विठ्ठलवाडी सरपंच महेंद्र पाटील, क्षत्रिय संचालक वासुदेव भोईर, मुखी – महेंद्र गवळी, यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी परिसरातून असंख्य महिला, तरुण-तरुणी व संत निरंकारी मिशनचे अनुयायी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते.

दुपारच्या सत्रात ग्रामपंचायत जलसार येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात कुणाल पाटील, निवृत्त फॉरेस्ट अधिकारी संदेश पाटील, जलसार सरपंच सौ.साक्षी गजानन गावड, टेंभीखोडावे उपसरपंच धनेश गावड उपसरपंच विंकोश म्हात्रे, सुभाष कदम, माजी सरपंच शरद घरत, सचिन पाटील, सुरज साळुंखे, संचालक वैभव गोरे, कुंदन राऊत, श्रीधर म्हात्रे तसेच परिसरातून संत निरंकारी मिशनचे 200 अनुयायी सहभागी झाले होते.



