शहर

सण नागपंचमीचा आणि वारसा परंपरेचा…अकलूज चा गुळ शेंगदाणा कार्यक्रम…

आमीर मोहोळकर,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

पूर्वीच्या काळी कै सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील नागपंचमी या सणानिमित्त बाजार तळावर “सुरपाट” खेळण्यास येत व खेळानंतर अकलूज च्या ऐतिहासीक विजय चौकातील दळवी किराणा दुकाना मध्ये आपल्या बलुतेदार सहकाऱ्या समवेत गुळ शेंगदाण्याचा आस्वाद घेत आणि गावातील सहकाऱ्या समवेत चर्चा करत असत व गौराईच्या तयारीला आपल्या सहकाऱ्या समवेत जात असत…

कै सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पश्चात आज देखील वर्षानुवर्षे अविरतपणे हाच वारसा जयसिंह शंकरराव मोहीते पाटील तथा (बाळदादा) यांनी जपलेला आहे…

आज वार – शुक्रवार दि.9/8/2024 रोजी नागपंचमी सणानिमित्त दळवी परिवाराच्या वतीने गुळ शेंगदाणा कार्यक्रम प्रसंगी जयसिंह मोहिते पाटील तथा (बाळदादा) यांचा सत्कार करताना दळवी परिवारातील जेष्ठ सदस्य महादेवराव दळवी दर वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी हि या कार्यक्रमास अकलूज मधील विविध संस्थाचे पदाधिकारी तसेच अकलूज मधील नागरिक उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button