शहर

अकलूज फोटो ग्राफर संघटना आणि कलासागर कलर लॅब तर्फे हजारों वारकरी भक्तांना स्नेह भोजन…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

काल अकलूज मुक्कामी असलेला जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील हजारों वारकरी वैष्णवांना अकलूज च्या ऐतिहासीक विजय चौकात स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते…

या स्नेह भोजनाचे आयोजन येथील प्रसिद्ध कलासागर कलर लॅब आणि अकलूज फोटो ग्राफर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कऱण्यात आली होती,या वेळी फोटो ग्राफर संघटनेने स्नेह भोजनासाठी आलेल्या हजारों वैष्णवांची मोठ्या भक्ती भावाने सेवा केली…

जवळ जवळ दोन ते अडीच हजार वारकरी बंधूनी या स्नेह भोजनास हजेरी लावली,भोजनासाठी टेबल,खुर्ची ची सोय करण्यात आली होती तर पाणी पिण्यासाठी फिल्टर पाणी मागविण्यात आले होते…

हा स्नेह भोजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फोटो ग्राफर संघटनेचे सर्व सदस्य परिश्रम घेत होते…

प्रेस फोटोग्राफर समीर तांबोळी यांचे फोटो सहाय्य…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button