शहर

तुळजापूर शहरातील रामदरा तलावात जाणारे विविध भागातील सांडपाणी बंद करण्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो . 97 30 867 448

तुळजापूर शहरातील हडको भीम नगर मातंग नगर इत्यादी भागातील वाहून जाणारे सांडपाणी जवळच असलेल्या रामदरा तलावामध्ये जात असल्याने तलावातील पाणी दूषित होत असून तुळजापूर शहरातील नागरिकांना आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने

सदरील तलावामध्ये वाहून जाणारे सांडपाणी तात्काळ बंद करण्याबाबत ची मागणी तुळजापूर शहरातील नागरिकांच्या वतीने होत असल्याने खासदारांनी त्या अनुषंगाने तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी योग्य ती कारवाई करून रामदरा तलावात वाहून जाणारे पाणी बंद करावे अशी मागणी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button