सफाळे केळवे दांडाखाडी येथील दुचाकीचा भीषण अपघात 7 जण जखमी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील दांडाखाडी ब्रीजच्या वळणावर दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघात 7 जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास घडली आहे .
रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सर्वत्र गटारी अमावस्येची धामधूम असतानाच केळवा भागातील दांडाखाडी ब्रीजच्या वळणावर रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन मोटर सायकलची समोरासमोर जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भयंकर होता की या अपघातात पाठीमागून डबलसिट येणारे आणखी एक दुचाकीस्वार देखील रस्त्यावर पडला .
या झालेल्या अपघातात केळवे येथील नावेश भांडार ( वय 27 वर्षे ) आणि नागेश भांडार ( वय 32 वर्षे ) तसेच दांडा गावातील जयेश बारी ( वय 30 वर्षे ), प्रतिक बारी व तिसऱ्या बाईक वरील अन्य दोन जण असे एकूण 7 जण जखमी झाले आहेत . या घटनेची माहिती मिळताच केळवा सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन यातील किरकोळ जखमी असणाऱ्या तिघांना सरकारी तर पायाला फ्रँक्चर असणाऱ्या एकाला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
याप्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यात मोटर वाहन अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून या याबाबत अधिक तपास केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस करत आहेत .



