महाराष्ट्र

डहाणू वडकुन येथील विनीत चौधरी याचा हत्यारा जितेंद्र(उर्फ) काळू डहाणू पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांचा जाळ्यात अटक.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.

डहाणू वडकुन येथील (30)वर्षीय विनीत चौधरी याची हत्या करणारा त्याचा मित्र जितेंद्र (उर्फ) काळू याला डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या पथकाने शुक्रवारी अटक करून जेरबंद केले आहे.

डहाणू वडकुन येथील (30)वर्षीय विनीत चौधरी व त्याचा मित्र जितेंद्र (उर्फ)काळू परशुराम दास राहणार डहाणू मसोली हे दोघेजण गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या दरम्यान बियर पिण्यासाठी डहाणू डम्पिंग ग्राउंड माणिक मेटल कंपनी पांचाळ हॉलच्या पुढे बसले होते. जितेंद्र (उर्फ)काळू यांच्यासोबत मयत विनीत चौधरी यांनी एक महिन्याआधी भांडण करून शाब्दिक बाचाबाची केली होती याचा राग मनात धरून जितेंद्र (उर्फ) काळू याने गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान बियर पिण्यासाठी बसलेल्या ठिकाणी जितेंद्र (उर्फ)काळुने विनीत चौधरी याच्या डोक्यात व हातापायावर सिमेंटचा वजनी पोल मारल्यामुळे त्याला जबरी दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. विनीत चा मृत्यू झाला असे समजल्यावर जितेंद्रने विनीतचा मृतदेह बियर पिण्यासाठी बसलेल्या ठिकाणी झाडी झुडपामध्ये लपून ठेवला होता.

विनीत चौधरी घरी परतला नव्हता म्हणून त्याचे आई-वडील व त्याचा लहान भाऊ त्याचा शोध घेत असताना विनीतची मोटरसायकल डहाणू डम्पिंग ग्राउंड माणिक पटेल कंपनी पांचाळ हॉलच्या पुढे दिसल्यावर त्याच्या लहान भावाने आजूबाजूला झाडी झुडपामध्ये शोध घेतल्यावर त्याला वास आल्यावर त्यांनी एका झाडीच्या झुडपामध्ये बघितल्यावर त्याला विनीतचा 8 दिवसांचा कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह दिसून आला होता.
घटनास्थळी डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी पाहणी केली होती. याबाबत अधिक तपास आणि या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित तपासाच्या अनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांनी हा तपास करण्याचे आदेश पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्याकडे सोपवले होते.

वरिष्ठांच्या आदेशान्वे व मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात, पोलीस उपनिरीक्षक सावंत देसाई, पोलीस उपनिरीक्षक सुळे यांच्या पथकासह डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, हवालदार राजेश रासम, हवालदार खांडवी,पोलीस नाईक भरसट, पोलीस कॉन्स्टेबल तळेकर, पोलीस कॉन्स्टेबल कदम, पोलीस कॉन्स्टेबल तळेकर या पथकाने अवघ्या 8 तासात आरोपी जितेंद्र (उर्फ)काळू याला अटक करून जेरबंद केले आहे.1

  1. ↩︎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button