महाराष्ट्र
मशाल पेटवून आमदार बाळासाहेब थोरात यांनी डहाणू येथे केले कलाक्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
डहाणू विधानसभेचे आमदार काॅ. विनोद निकोले यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या कला क्रिडा महोत्सवास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित राहून मशाल पेटवत या कला क्रिडा महोत्सवाचे बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी उदघाटन केले. व उपस्थित डहाणू , तलासरी येथील सर्व खेळाडुंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांचे डहाणू मतदारसंघातील आदिवासी बांधवांनी व विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्य सादर करत जंगी स्वागत केले.
याप्रसंगी आमदार काॅ. विनोद निकोले, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख व सर्व पक्षीय महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




