पालघर जिल्हा डहाणू तालुका कासा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी शादाब शेख या बोगस डॉक्टरांवर केला गुन्हा दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका कासा पोलीस ठाणे हद्दीतील एका बोगस डॉक्टरांवर कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी कारवाई करून कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शादाब गणी शेख वय वर्ष (58)असे या बोगस डॉक्टरांचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील वाडा येथील पाटील आळी येथे राहत आहे.
यांच्याकडे कोणताही वैद्यकीय व शैक्षणिक पात्रता तसेच वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र नसताना देखील हा डॉक्टर ॲलोपॅथिक औषधे व नीडल (सुई) इंजेक्शनचा वापर करून तो डॉक्टर नसताना देखील कासा – डहाणू हद्दीतील नागरिकांना मी डॉक्टर असल्याचे सांगून डहाणू कसा भागातील नागरिकांची फसवणूक करून नागरिकांवर उपचार करत होता.
या बोगस डॉक्टरांविरुद्ध 27 जुलै 2024 रोजी कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी या डॉक्टरांना ताब्यात घेऊन या डॉक्टरांच्या ताब्यातील 3474 रुपये किमतीची ॲलोपॅथिक औषधे, निडल (सुई ),इंजेक्शन,गोळ्या व तो गावागावात फिरण्यासाठी वापरत असलेली सफेद रंगाची MH- 48 -CU -2323 क्रमांकाची स्कुटी मोटरसायकल असा एकूण 78479 रुपयांचा मुद्दे मला जप्त करून या बोगस डॉक्टरांवर 28 जुलै 2024 रोजी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास कोथे करत आहेत.



