महाराष्ट्र

संग्राम नगर अकलूज येथील जयसिंह मोहिते पाटील , विद्यालय व प्राथमिक विभागात योगा दिन साजरा

उपसंपादक ——हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

दिनांक 21 जून 2023 राष्ट्रीय योग दिना निमित्त श्री. जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय व प्राथमिक विभाग संग्रामनगर या प्रशालेमध्ये योग दिन साजरा करण्यात आला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी योग प्रशिक्षक डॉ.मंगेश शिंदे हे होते त्यांनी सर्व मुलाकडून अतिशय आनंदी वातावरणामध्ये योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले

तसेच योगाचे महत्त्व मुलांना सांगितले सर्व मुलांनी देखील उत्साहाने व आनंदाने योगाचे प्रात्यक्षिक केले मुलांबरोबर विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांनी देखील योगाचे प्रात्यक्षिक केले योग प्रशिक्षक मंगेश शिंदे यांनी योगाचे प्रात्यक्षिक करत असताना ते प्रात्यक्षिक केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणते बदल होतात

तसेच शहराचे संतुलन कशा प्रकारे व्यवस्थित व सुरळीत चालते हे मुलांना समजावून सांगितले याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक घुले सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक फिरोज तांबोळी सर व पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सूर्यवंशी मॅडम व प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button