महाराष्ट्र

भव्य एकेरी २०२३ राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये अकलूजच्या बापु साळुंखे यांनी पटकावला चौथा क्रमांक

संपादक नौशाद मुलाणी
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.नं. :- 96 73 65 59 65

बारामती : अजीज भैय्या शेख मित्र परिवार यांच्या विद्यमाने बारामती येथे दोन दिवसीय भव्य अशा एकेरी २०२३ राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक मा.सुधीर नाना सोनवणे मा नगरसेवक ‘ बा.न.प. यांच्या हस्ते पार पडले.यावेळी प्रमुख पाहुणे तैनुर भाई शेख, सुजित जाधव आणि आयोजक विशाल सोनवणे यांच्या उपस्थितित करण्यात आले. या स्पर्धेसाठी राज्यातील व राज्याबाहेरील स्पर्धकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला होता. यामध्ये तेलंगणा,मुंबई, पुणे,सोलापूर, अकलूज, करमाळा,फलटण आणि बारामती येथून खेळाडूनीं सहभाग नोंदवला होता.

या कॅरम स्पर्धेचा अंतिम दिवस मंगळवार दि. ३/१०/२०२३ रोजी फायनल चा दिवस असल्याने पुर्ण दिवस झालेल्या स्पर्धांचे रंगत वाढल्याने हा खेळ वेळेच्या दोन तास उशीर पर्यन्त चालला असुन अनेक कॅरम प्रेमीनी उत्साहाने फायनल मँच पहायला गर्दी केली होती.सदर स्पर्धे मध्ये एकुण ६४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामधील काही स्पर्धकांत फायनल खेळवण्यात आल्याने यामध्ये एकुण आठ जण स्पर्धकांनी बाजी मारली. त्या मध्ये प्रथम क्रमांक विकी आण्णा.(पुणे) दुसरा क्रमांक इम्तियाज हुजरे (पुणे) तिसरा क्रमांक नकुल काकडे (पुणे) चौथा क्रमांक बापू साळूंखे (अकलूज) पाचवा क्रमांक.भोला सोनवणे (बारामती) साहवा क्रमांक जयकुमार (हैदराबाद) सातवा क्रमांक रहीम खान (पुणे) आठवा क्रमांक आमिर बागवान (बारामती) अशा या स्पर्धकांनी आपल्या खेळाच्या कौशल्यावर पारितोषिक पटकवून सदर बक्षिस मिळवले त्या सर्वांचे अभिनंदन व ज्या सर्व स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या सर्वांचे सुद्धा सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन व आभार अजीज भैया शेख मित्र परीवार यांच्याकडून मानण्यात आले.

या कॅरम स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. या कॅरम स्पर्धा यशस्वी पार पडण्याकामी आयोजक विशाल सोनवणे, समीर बागवान, भोला सोनवणे, विकास वाडीले, राहुल साबळे, सचिन अहिवळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले व इतर सहकारी कॅरम प्रेमी बारामती यांच्या कडून सहकार्य लाभले.

अकलूज गावचे सुपुत्र ( कॅरम किंग ) बापू साळुंखे यांनी या कॅरम स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक मिळवल्याबद्दल अकलूजच्या कॅरम प्रेमींकडून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button