सदाशिवराव माने विद्यालयामध्ये शिक्षक पालक सभा संपन्न.

संपादक नौशाद मुलाणी
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.नं. :- 96 73 65 59 65
वार गुरुवार दिनांक 5/10/2023 रोजी विद्यालयामध्ये इयत्ता आठवी ते दहावी मध्ये शिकत असलेल्या सर्व मुलींच्या पालकांची सहविचार सभा शिक्षक पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए.के. फुले सर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सध्याचा काळ हा धावपळीचा व स्पर्धेचा आहे त्याचबरोबर संस्कारक्षम वर्तनाचाही आहे. आठवी ते दहावी मध्ये शिकत असलेल्या मुलींचे बेफिकीर वागणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष, मोबाईलचा अतिवापर, पालक वडीलधाऱ्यांचे ऐकण्याची मानसिकता नसणे, अशा विविध समस्यांवर पालकांशी चर्चा करणे, हितगुज करणे या उद्देशाने या सभेचे आयोजन विद्यालयामध्ये ऋतुजादेवी मल्टीफंक्शनल हॉल या ठिकाणी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी करण्यात आले.
या सभेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे विद्यालय परिवाराच्या वतीने स्वागत करून वरील हेतू सर्वांना सांगण्यात आला त्यानंतर विद्येची देवता सरस्वती , कर्मवीर बाबासाहेब माने पाटील, सहकार महर्षी काकासाहेब व आक्कासाहेब ,धर्मवीर सदुभाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री विशाल जगताप , माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ पताळे मॅडम , विद्यालयाचे मुख्याध्यापक व दोन्ही संघांचे पदसिद्ध अध्यक्ष श्री ए.के. फुले सर , उपमुख्याध्यापक श्री डी. के. घंटे सर व माध्यमिक विभागाचे शिक्षक प्रतिनिधी श्री डी आर मगर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यानंतर विद्यालय परिवाराच्यावतीने शिक्षक पालक संघ व माता पालक संघ या दोन्ही संघाचे उपाध्यक्ष ,उपस्थित सर्व सदस्य यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए. के. फुले सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . मार्गदर्शनामध्ये त्यांनी मुलींचे बेफिकीर वागणे, वडीलधाऱ्यांचे ऐकण्याची क्षमता कमी असणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष, मोबाईलचा अतिवापर , मुलींच्या विविध समस्या व त्याचे निराकरणाचे उपाय या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले .
तसेच आपली कोणती समस्या असेल ,आपल्या पाल्याची आपल्याला चौकशी करायची असेल तर आपण केव्हाही विद्यालयामध्ये यावे आणि वर्गशिक्षक व पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा अशी देखील विनंती याप्रसंगी त्यांनी केली. तसेच पालकांच्या काही समस्या असतील प्रश्न असतील तर विचारण्याचे आव्हान देखील केले. त्यानुसार काही पालकांनी आपल्या समस्या त्या ठिकाणी व्यक्त केल्या त्या समस्यांना विद्यालय परिवाराच्या वतीने आजचे प्रमुख मार्गदर्शक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए.के.फुले सर यांनी उत्तरे दिली.
सर्व पालकांच्या शंकांचे समाधान झाले त्यातील काही पालकांनी अशी सभा घेतल्याबद्दल विद्यालयाचे धन्यवाद व्यक्त केले व अशा सभा भविष्यात देखील घेतल्या पाहिजेत व या संदर्भातील चर्चा ही सर्वांसमवेत झाली पाहिजे अशी इच्छा देखील व्यक्त केली. सर्व सभा खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली. शिक्षक प्रतिनिधी श्री डी आर मगर सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.



