शहर

दलित युवकाच्या आत्महत्येस कारणीभूत आरोपीस अटकेस दिरंगाईपीडित दलित कुटुंब जरांगे स्टाईल ने ग्रामपंचायतीसमोर आंदोलनास बसणार

करमाळा: प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

तालुक्यातील अंजन भाऊ येथील महादेव बन्सी रणदिवे यांनी ०३/०६/२४ रोजी आत्महत्या केली असून आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवून आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपींची नावे घेतलेली आहेत.सदरील व्हिडिओ हा प्रथमदर्शनी पुरावा असूनही आरोपी अटक करण्यास विलंब केला जात असून हा गंभीर प्रकार करमाळा पोलिस प्रशासनाकडून घडला असून एक महिना उलटूनही आरोपी अटक नाही त्यामुळे सनदशीर आंदोलन करूनही याचे गांभीर्य प्रशासनास नाहीत् यामुळे सदरील पीडित कुटुंब श्री जरांगे पाटील यांच्या स्टाईल ने अंजनडोह ग्रामपंचायती समोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन आरपीआय(आ) पश्चिम संघटक नागेश दादा कांबळे यांनी प्रशासनास दिले आहे,


निवेदनात पुढे म्हटले आहे की अट्रोसिटी कायद्याच्या तरतुदीनुसार मा तहसीलदार हे दक्षता व नियंत्रण समितीचे तालुका अध्यक्ष असतात.मा पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी 24 तासाच्या आत या घटनेचा अहवाल दिला पाहिजे.तो अहवाल घेऊन ती माहिती मा जिल्हाधिकारी मा समाजकल्याण अधिकारी,मा पोलीस अधीक्षक यांना तात्काळ द्यावी लागते.कारण अट्रोसिटी अंतर्गत दक्षता व नियंत्रण समिती काम करते त्याचे वरिष्ठ अधिकारी हे अध्यक्ष सचिव व सदस्य आहेत इतकी सोप्पी प्रक्रिया अट्रोसिटी कायद्या बाबत असूनही नेमके पाणी कुठे मुरते हा चिंतेचा विषय असून शुक्रवार दि १२/०७/२४ रोजी सकाळी ठीक 7-30 वा पीडित कुटुंब ग्रामपंचायती समोर उपोषणास बसणार असून सदरील आंदोलनास राज्यभरातून, जिल्हाभरातून दलित समाजाचे वरिष्ठ नेते,सामाजिक कार्यकर्ते भेट देतील,हे आंदोलन जिल्हाव्यापी करण्याचा प्रयत्न केला जाईल,

या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिस प्रशासनाची असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवावा असे देखिल निवेदनात म्हटले आहे,मुख्यमंत्री,गृहमंत्री,पालकमंत्री ,जिल्हाधिकारी,पोलिस महाअधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी,तहसीलदार ,करमाळा पोलीस निरीक्षक यांना सदरील निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button