संपादकीय

बागल कुटुंबातील बहिण भावंडाचा अखेर त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबई येथे भाजपामध्ये प्रवेश,, बागलांच्या भाजपा प्रवेशाने करमाळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील एकेकाळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते तसेच माजी सामाजिक न्याय मंत्री दिवंगत दिगंबररावजी बागल यांचे ज्येष्ठ पुत्र दिग्विजय बागल तसेच कन्या रश्मीताई बागल यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलासाखर संघाच्या मुंबई संचालिका रश्मी बागल तसेच मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल या दोघा बहीण भावंडांनी आज मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला याचवेळी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांनी देखील याचवेळी भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार रणजीत सिंह निंबाळकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत यावेळी उपस्थित होतेयाचवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे विद्या विकास शिक्षण मंडळाचे सचिव विलास घुमरे मार्केट कमिटीचे संचालक काशिनाथ काकडे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन नानासाहेब लोकरे, मकाईचे संचालक आशिष गायकवाड, मकाईचे संचालक अनिल अनारसे, कलीम काजी, आनंदराव कांबळे, एडवोकेट नानासाहेब शिंदे तसेच विकास भोसले यांनी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाकरमाळा तालुक्यातील मोठा गट म्हणजे बागल गट आता भारतीय जनता पार्टीमध्ये त्याची विलीनीकरण झाले असून यामुळे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्य मंत्री तसेच मराठवाड्यातील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता त्या खालोखाल आता उमरगाचे माजी मंत्री बसवराज पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने करमाळा तालुक्यातील राजकीय समीकरणे आता बदलणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button