माळीनगर मुस्लिम समाज बांधवांचा आंदोलनाचा इशारा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील मुस्लिम समाज बांधवांच्या दफनभूमीची होत असलेले विटंबना व शेणखत, कचरा टाकून अतिक्रम करण्याचा प्रयत्न प्रशासनाने तात्काळ थांबवावा अन्यथा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जनआंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे गटविकास अधिकारी माळशिरस, ग्रामपंचायत माळीनगर, पोलीस निरीक्षक अकलूज, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज, यांना देण्यात आला आहे माळीनगर गावाला हागणदारी मुक्त पुरस्कार प्रदान झाला असला तरी आजही मुस्लिम दफनभूमी मध्ये लोक राजरूसपणे शौचायास बसत आहेत परंतु याकडे कोणाच्याही लक्ष नाही, मुस्लिम समाज बांधवांनी वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायत या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे कारण काही आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी या मध्ये हस्तक्षेप करत असल्याचा मुस्लिम समाज बांधवांचे म्हणणे आहे. दोन समाजामध्ये जातीय सलोखा बिघडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत कुंपणच शेत खात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे हा समाजाला पडलेला प्रश्न आहे.दफनभूमीच्या जागेमध्ये शेणखत कचरा, शौचालयाचे पाणी सोडणे, सांडपाणी सोडणे, शौचायास बसणे, संरक्षण भिंतीची तोडफोड करणे, ही होत असलेली विटंबना व शेणखत, कचरा ,टाकून अतिक्रम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.अन्यथा समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे



