तुळजापूर येथील रामदरा तलावात मैलामुक्त पाण्यामुळे आपसिंगा येथील पाणी पुरवठा योजनेचा स्ञोत बदलून द्यावा–ओम राजे निंबाळकर

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
तुळजापूर येथील रामदरा तलावा मधील मैलायुक्त पाण्यामुळे आपसिंगा ता. तुळजापूर येथील पाणी पुरवठा स्ञोत बदलून देण्याची मागणी धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजे निँबाळकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण धाराशिव चे कार्यकारी अभियंता यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली असुन आपसिंगा ता.तुळजापूर हे गाव केंन्द्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेत समाविष्ट असुन सदर गावाकरिता जलजीवन मिशान अंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणे करिता

प्रस्ताविक केलेल्या स्त्रोतातील पाणी हे तुळजापूर शहराचे महिला विशेष असल्याने नागरिकांना या स्त्रोतामधून पाणीपुरवठा करण्यासाठी विरोधातून सदर गावामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याचे नमूद करत प्रस्ताविक जलस्त्रोत बदलणे बाबतची मागणी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले असून आपसिंगा ता. तुळजापूर येथील जल जीवन मिशन अंतर्गत प्रास्ताविक पाणीपुरवठा योजनेच्या स्त्रोत बदलून आपसिंगा परिसरातील स्ञोता मधून पाणीपुरवठा करून योग्य ती कार्यवाही करावी सोबत आपसिंगा ग्रामपंचायत चा ठराव जोडला आहे असेही निवेदनात म्हटले आहे .




