गुरुपौर्णिमा निमित्त सवतगव्हाण येथे यशराजभैया मित्र मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा संपन्न

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो 99 21 500 780
माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण येथे गुरुपौर्णिमा निमित्त सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा यशराजभैय्या मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांचा हार, फेटा, व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाषराव निंबाळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांकडून लोकनेते कै. रावसाहेबदादा निंबाळकर यांच्या संकल्पनेतील नियोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकाम करण्याचे सुचविले उपसरपंच यशराज निंबाळकर यांनी मंदिर बांधकाम लोकसहभागातून चालू वर्षात काम चालू करू असे आश्वासन सर्व उपस्थितांना दिले तसेच गावातील लक्ष्मी मंदिर नवीन बांधकाम गावातील विविध विकास कामाबद्दल देखील माहिती दिली,सर्व उपस्थिततांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती
याप्रसंगी गावचे माजी सरपंच व माळशिरस तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितिनराजे निंबाळकर, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक विराजसिंह निंबाळकर, रामचंद्र निंबाळकर, मुस्लिम समाजाचे जेष्ठ नागरिक अब्बासभाई तांबोळी, माजी उपसरपंच अविनाश जाधव, दादासाहेब लवटे, श्रीनिवास जाधव, राजेश शिंदे- पाटील, अमोल बोरावके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ रणजितबापू निंबाळकर यांनी केले तर आभार अविनाश जाधव यांनी मानले.



