महाराष्ट्र

विशाल गड घटनेचा करमाळा मुस्लिम समाजाने केला तीव्र शब्दात निषेध,हाजी कलीम काझी

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेस हिंसक वळण लावुन अल्पसंख्याक समाजाला जाणीवपूर्वक लक्ष करत असुन. तेथील झालेल्या अतिक्रमणाला व अतिक्रमण काढण्यासाठी मुस्लीम समाजाचा पुर्ण पणे पाठिंबा असुन ते अतिक्रमण प्रशासनाने तात्काळ काढण्याची मागणी आहे व तेथे घडलेल्या गोष्टींचा मुस्लीम समाज निषेध व्यक्त करत असुन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज , महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना हरताळ फासणारी घटना आहे . याचा मुस्लीम समाज निषेध करत आहे .

सकल मुस्लीम समाज करमाळा चे मार्गदर्शक व शहर काझी हाजी कलीम काझी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मुस्लीम समाज चे शहर अध्यक्ष जमीर भाई सय्यद , आझाद भाई शेख (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट ), अशपाक भाई जमादार ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर जिल्हा अजित पवार गट ) सोहेल भाई पठाण ( करमाळा शहर अध्यक्ष अजित पवार गट ) यांनी निवेदन मा.नायब तहसीलदार करमाळा व मा. बनकर साहेब पोलीस उपनिरीक्षक करमाळा पोलीस ठाणे यांना दिले आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1659 साली विशाळगड किल्ला जिंकला होता व जवळ जवळ 45 वर्षे तेथे महाराजांची सत्ता होती व त्या काळापासून रेहान मलिक दर्गा व मशीद होती त्या काळात महाराजांनी या वास्तूंचे संरक्षण केले आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही समाजाला आवाहन करतो की कोणत्याही अफवांवर वर विश्वास न ठेवता सामाजिक जाणीव ठेवून शांतता ठेवून आपले सामाजिक बांधिलकी जपत सौहार्दाचे वातावरण समाजात राहील असे प्रयत्न करावे .

अशा घटना घडु नये म्हणून मा. यमुख्यमंत्री, मा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हा अधिकारी,व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घातले पाहिजे असे समस्त समाजा तर्फे विनंती करत आहोत.
यावेळी जिशान कबीर.अलीम खान.शाहिद बेग. बाबा कुरैशी. कदीर सय्यद. जावेद मदारी. आलीम शेख. आयुब मदारी. जमीर मदारी. जमील मदारी . रमज़ान सय्यद मुबारक मदारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button