पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकात जखमी अवस्थेत पडलेल्या एका (25) वर्षीय बेवारस तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म वरून रेल्वे रुळावर पडलेल्या एका (25) वर्षीय बेवारस तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ही घटना बुधवारी डहाणू येथे घडली आहे.
पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानका वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 वर नशेच्या अवस्थेमध्ये बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी भगव्या रंगाचा हाफ टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, उंची पाच फूट पाच इंच, अंगाने सडपातल, रंगाने गोरा, चेहरा -उभट, सरळ नाक काळे केस मध्यम वाढलेले अशा वर्णनाचा एक (25) वर्षीय तरुण दुपारी झोपला होता.

तो संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 वरून रेल्वे रुळावर खाली पडल्यामुळे तो जखमी झाला होता.
याबाबत डहाणू रेल्वे पोलिसांनी या तरुणाला त्वरित डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना त्याचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे.
याबाबत डहाणू रेल्वे पोलिसांनी अधिक माहिती आणि तपास केला असता तो बेवारस असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर मयत इसमा बाबत काही एक माहिती प्राप्त झाल्यास पालघर रेल्वे पोलीस उपनिरीक्षक पडवळ 9664601402, आणि पोलीस शिपाई ढोणे यांच्याशी 8767779303 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे रेल्वे पोलीस यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.



