शहर

दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तम गुण संपादन केलेल्या आगरी समाजाच्या सफाळे विभागातील शंभरहून अधिक गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

पालघर तालुका आगरी समाज संघा तर्भे राधाचंद्र हेरिटेज हॉल सफाळे येथे रविवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी राजन घरत सर यांच्या अध्यक्षते खाली दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तम गुण संपादन केलेल्या आगरी समाजाच्या सफाळे विभागातील शंभरहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला विध्यार्थ्यांसह त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आगरी समाजाकडून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या समाजातील विध्यार्थ्यांचा गुणगौरव होतोय त्या बद्दल उपास्थित पालकांनी आभार व्यक्त केले आणि भविष्यात ही असे कार्यक्रम होत रहावे म्हणून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.


सत्कारमूर्ती विध्यार्थ्यांपैकी काही विध्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्या शाळेत जे टॉपर्स असतात त्यांचा गौरव केला जातो मात्र आपल्या समाजाकडून समाजातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून सामूहिक सन्मान सोहळा होणे हा अनुभव खरंच खूप आनंददायी आणि गौरवास्पद आहे.


आगरी समाजातील भावी पिढीच्या चेहऱ्यावरील आनंदाने सभागृहातील वातावरण सुखकारक झाले होते.
या कार्यक्रमाचे आयोजक राजन घरत सर आणि त्यांच्या सहकाऱ्याचे विध्यार्थ्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या सन्मान सोहळ्या प्रसंगी आगरी समाज संघाचे महेंद्र पाटील सर , जगदीश किणीसर,.नरेश किणी, .दत्तात्रेय भोईर, उमेश किणी, रमण पाटील, बाबुराव भोईर , बालेश कोटी ,सावंत सर,विनोद घरत , दीपक घरत ,पुंडलिक घरत , हेमंत पाटील, राजन पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button