डहाणू चिंचणी एम के ज्युनिअर कॉलेज मध्ये एक राखी-एक झाड संकल्पनेतून रक्षाबंधन ..

टाईम्स नाईन न्यूज नेटवर्क उपसंपादक-विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640
पालघर जिल्ह्यातील डहाणू चिंचणी येथील एम्. के.ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे अनोख्या पद्धतीने मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
वर्तमान काळात पर्यावरणाचा समतोल बिघडत असून तापमान वाढीचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे.यावर मात करण्यासाठी स्वयंसेवक विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती ,सण व उत्सव हे पर्यावरण पूरक कसे आहेत व बहिण भावाच्या अतुट नात्याचा उत्सव वेगळया पद्धतीने माहिती व्हावा म्हणून रक्षाबंधन सणा निमित्ताने एक झाड – एक राखी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्ष प्रा. सौ.संगीता चुरी उपस्थित होत्या . झाडाला राखी बांधून त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे ते विद्यार्थी करतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
कला विभाग प्रमुख प्रा. स्वाती राऊत यांनी आपण प्रत्येक नात्याचा आदर करणे, एकनिष्ठ असणे, प्रामाणिकपणे रहाणे असे मत व्यक्त केले. तर
विज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुरज आष्टेकर यांनी झाडे बोलतात भावना व्यक्त केल्या विद्यार्थी, शिक्षक यांना प्राध्यापिका, विद्यार्थीनीनी राखी बांधुन प्रत्येक विद्यार्थ्याला एक देशी झाडांचे रोप दत्तक देऊन त्यास राखी बांधून संपूर्ण आयुष्यभर त्याचे जतन व संरक्षण करणार अशी शपथ घेण्यात आली.
तसेच जसे की बहिण भावाचे किंवा भाऊ बहिणीचे संरक्षण करतो त्याप्रमाणे झाडांचे संरक्षण करावे हि आपली जबाबदारी आहे. असे प्रास्ताविकातून कार्यक्रम अधिकारीं सूत्रसंचालक व आयोजक प्रा.एकनाथ पाटील यांनी केले. आभार प्रा.अश्विनी मोरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



