महाराष्ट्र

वाफेगाव ता. माळशिरस येथील ग्रामसभेत विविध मागण्याचे निवेदन प्रशासक –भोसले यांना सादर

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.—– 97 30 867 448

वाफेगाव ता. माळशिरस जि. सोलापूर येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा दिनांक 25 जुलै 2023 रोजी संपन्न झाली या ग्रामसभेत केंद्र शासनाकडून रखडलेल्या लोकसंख्या मोजणी, जात निहाय लोकसंख्या सर्वेक्षण करण्याच्या मागणीचा ठराव तसेच अनुसूचित जाती नवबौद्ध घटक यांच्या विकास आराखड्या संबंधी अशा विविध मागण्याचे निवेदन वाफेगाव येथील युवक वर्गाच्या उपस्थितीत व सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने ग्रामपंचायतचे प्रशासक भोसले यांना देण्यात आले

याप्रसंगी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस– किशोर राजे गाडे पाटील, सरपंच विष्णुपंत गाडे पाटील, ग्रामसेवक क्षीरसागर मॅडम ,तंटामुक्तीचे अध्यक्ष –किसन गायकवाड, युवा कार्यकर्ते- उमेश सरतापे, अजय गाडे, रोहन सोनवणे, सचिन गाडे, सुरज गाडे ,आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button