अखिल भारतीय राष्ट्रीय कॅांग्रेस अल्पसंख्यांक विभाग माण खटाव मतदार संघ अध्यक्ष पदी इम्रानभाई बागवान यांची निवड…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या बैठकीत वडूज येथील इम्रानभाई बागवान यांची माण खटाव तालुक्याच्या अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून तसे पत्र त्यांना देण्यात आले…

वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते असलेले इम्रानभाई बागवान यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत मागील लोकसभेला उत्स्फूर्त असे काम माण खटाव तालुक्यातील केल्याने पक्षाने या कामाची दखल घेत हि निवड केल्याचे त्यांनी सांगितले…

या वेळी महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमेटी चे प्रभारी श्रीरंग चव्हाण साहेब,अखिल भारतीय राष्ट्रीय कॅांग्रेस चे सदस्य रणजीतसिंह (भैय्या) देशमुख,सातारा जिल्हा कॅांग्रेस चे अध्यक्ष डॅा सुरेश जाधव,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार,युवक जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे,सौ अल्पना यादव,सौ धनश्री महाडीक,डॅां संतोष गोडसे,जिल्हा परीषद सदस्य निवास थोरात,नरेश देसाई यांच्या सह काँगेस चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते…



