पत्रकारितेच्या क्षेत्रात आमीर मोहोळकर यांचं “काम बोलता है”…जुबेरभाई बागवान

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
बागवान जमियत चॅरीटेबल ट्रस्ट,सोलापूर यांनी आयोजित केलेल्या मुस्लिम समाजातील सर्व घटकांचा वधू वर मेळाव्या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत चे अध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्या हस्ते अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते आणि टाइम्स 9 चे पत्रकार आमीर मोहोळकर यांची बागबान न्यूज सोलापूर च्या अकलूज प्रतिनिधी निवडी चे ओळख पत्र प्रदान करण्यात आले…

या वेळी बोलताना जुबेर भाई बागवान म्हणाले की,आमीर मोहोळकर यांचे मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व सर्व काही सांगून जाते,लोकसभा निवडणुकीच्या काळात टाइम्स 9 च्या माध्यमातून माढा मतदार संघातील अनेक राजकीय सभांचे त्यांनी केलेले विश्लेषण वाखाणण्याजोगे होते,त्यामुळेच “बागबान न्यूज” वर त्यांची झालेली निवड हि त्यांचं “काम बोलता है” असे प्रतिपादन जुबेभाई बागवान यांनी केले…
या वेळी सोशल बँकेचे मा चेअरमन हाजी मुनाफभाई चौधरी,नजाकत अली मंदृपकर,इब्राहिम मैंदर्गीकर यांच्या सह मुस्लीम समाजातील सर्व घटक हजारो च्या संख्येने उपस्थित होते…



