करमाळा वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड. रवींद्र बरडे, उपाध्यक्षपदी ॲड. सुनील रोकडे तर सचिवपदी अॕड विनोद चौधरी यांची निवड

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63
करमाळा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष ॲड. महादेव सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडून त्यामध्ये नविन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ॲड. रवींद्र बरडे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. सुनील रोकडे तर सचिव म्हणून ॲड. विनोद चौधरी, सहसचिव म्हणून ॲड. शेखर गाडगे तर खजिनदारपदी अँड प्रशांत बागल यांची निवड करण्यात आली. सदर निवडीची प्रक्रिया बार असोसिएशनच्या कार्यालयात पार पडली

करमाळा तालुका वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार तसेच सर्व सदस्यांचे करमाळा न्यायालयाचे न्यायाधीश माननीय मीना एखे मॅडम यांनी विशेष अभिनंदन केले आहे यावेळी करमाळा वकील संघाचे बहुसंख्यविधीज्ञ हजर होते. या निवडीनंतर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. पी. लुणावत, ॲड. एस. पी. रोकडे, ॲड. अँड कमलाकर वीर अँड राजेश दिवाण अँड शहानुर सय्यद व सर्व वकील संघाचे सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शनाचे कामकाज अँड जयदीप देवकर यांनी मानले तर सूत्रसंचालन अँड विनोद चौधरी यांनी केले त्याचबरोबर उपस्थित विधिज्ञानी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
वकील संघाचे अध्यक्ष म्हणून अँड रवींद्र बरडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे
वकील संघांच्या सदस्याचे अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती वकील संघाचे नूतन अध्यक्ष अँड रवींद्र बरडे यांनी बोलताना सांगितले



