विशेष

आगरी समाज सेवाभावी संस्था यांच्या विद्यमानाने जिल्हास्तरीय किशोरवयीन गटाची आणि खुल्या गटाची कबड्डी स्पर्धा सफाळे केळवा रोड येथे संपन्न

टाईम 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

आगरी समाज सेवाभावी संस्था केळवेरोड सफाळे यांच्या विध्यमाने आणि पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी केळवेरोड ( पूर्व) येथील नियोजित आगरी समाजभवनच्या मैदानावर जिल्हास्तरीय किशोरवयीन गटाची आणि खुल्या गटाची कबड्डी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.सदर जागेवर आगरी समाजाच्या भव्य व्यासपीठाचे काम चालू असून संस्थेचे अध्यक्ष महादेव गणपत घरत यांच्या शुभहस्ते व्यासपीठाच्या पायरीचे पूजन करण्यात आले. कबड्डी स्पर्धेचे उदघाट्न विशेष देणगीदार व संस्थेचे सदस्य रमेश मुकुंद भोईर रावळे (केळवे रोड )यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

आगरी सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतन गावड यांनी सदर जागेवर आगरी समाज भवन बांधावे ही संकल्पना खूपच छान असून संस्था कमिटीचे अभिनंदन केले व कमिटीच्या संमतीने पुढील एक वर्षात याच ठिकाणी पालघर जिल्हा आगरी सेनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आजी आजोबा पार्क आणि बालोध्यान बांधून देण्याचे जाहीर केले.संस्थेचे सदस्य दत्तात्रेय भोईर यांनी आगरी समाज सेवाभावी संस्था ही केळवेरोड पंचक्रोशीतील आगरी बांधवांनी एकत्र येउन संस्थापित केलेली संस्था असून इथे होणारे प्रत्येक कार्य हॆ आगरी समाजाचे आहे. आगरी समाजातील विध्यार्थी, तरुण, प्रौढ आणि महिला भगिनींना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केळवेरोड सारख्या मध्यवर्ती ठिकाणी हक्काचे व्यासपीठ मिळावे हेच संस्थेचे उद्दिष्ट असून लवकरच या जागेवर आगरी समाज भवन व्हावे म्हणून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.कबड्डी स्पर्धेसाठी खेळाडूं तसेच प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत किशोरवयीन गटात प्रथम पारितोषिक धाकटी डहाणू संघ , द्वितीय पारितोषिक चहाडे संघ, तृतीय पारितोषिक श्रीराम विरार तर चतुर्थ परितोषिक नवनीत माले या संघांनी पटकावले.तर खुल्या गटातून प्रथम पारितोषिक लवकुश बोईसर, द्वितीय पारितोषिक छावा स्वराज माकणे, तृतीय पारितोषिक जय शिवाजी केळवेरोड तर चतुर्थ पारितोषिक लवकुश क्रीडा मंडळ बोईसर यांनी पटकावले.संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान विशेष देणगीदार आत्माराम हाशा पाटील- चांदीप, मनोहर महंते- केळवेरोड, परेश महादेव घरत केळवेरोड यांनी ऊपस्थित राहून संस्थेस शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे संस्थेचे संचालक सदस्य,देणगीदार सदस्य, सभासद आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. बक्षिस समारंभसाठी खासदार राजेंद्र गावीत आणि आगरी सेना राज्य उपाध्यक्ष कैलास पाटील उपास्थित होते.या प्रसंगी बोलताना ऍडव्होकेट नवीन घरत यांनी आगरी समाज संस्थेच्या कार्याचे अभिनंदन करून समाजासाठी जिथे गरज लागेल तिथे सदैव तत्पर राहून कार्य करीत राहण्याचे सुतोवाच केले व संस्थेस पुढील असलेली चळवळ याची माहिती करून दिली. आपल्या विखूरलेल्या समाज बांधवांनी एकत्र येउन समाजाची शेकडो एकर खांजन जागा जी इतरांच्या कबज्यात आहे ती सोडवून समाज बंधवांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आंदोलन करण्याचा इशारा दिला. खासदार गावीत यांनी आपल्या भाषणात सांगितले की आगरी समाजाच्या नावातच आग आहे. आगरी समाज बांधव हा स्वभावाने अत्यंत तिखट परंतु तेवढाच प्रेमळ असून आदरांतिथ्या मध्ये नेहमीच पुढे असतो माझ्या राजकीय वाटचालीत अगदी सुरुवाती पासूनच आगरी समाजाने खूप साथ दिली असून समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी शासन दरबारीं नक्कीच प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.तदनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना क्रीडा समितीचे कल्पेश घरत व संजय किणी यांनी केली तर सूत्र संचालन हेमंत पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button