महाराष्ट्र

इंदापूर तालुका प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्हा परिषद शाळा डिसलेवस्ती (गिरवी) विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, 8378076123

इंदापूर तालुका प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्हा परिषद शाळा डिसलेवस्ती (गिरवी) विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश. राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन दिलीप बागल यांच्या हस्ते करण्यात आले.

इयत्ता चौथीच्या आदित्य अजिनाथ बागल – बावडा बीट मध्ये – प्रथम क्रमांक, पिंपरी केंद्रामध्ये – प्रथम क्रमांक, अविष्कार अजिनाथ बागल – बावडा बीट मध्ये – द्वितीय क्रमांक, पिंपरी बु केंद्रामध्ये – द्वितीय क्रमांक, श्लोक दिलीप बागल – बावडा बीट मध्ये – चौथा क्रमांक, पिंपरी बु केंद्रामध्ये – तृतीय क्रमांक, शिवांजली रामचंद्र क्षिरसागर – पिंपरी बु – केंद्रामध्ये – चौथा क्रमांक, समृद्धी नवनाथ देठे – पिंपरी बु केंद्रामध्ये – सहावा क्रमांक आल्यामुळे सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा स्थापन समिती डिसलेवस्ती ( गिरवी ) यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

इंदापूर तालुका प्रज्ञा शोध परीक्षेत डिसलेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश इयत्ता तिसरीच्या ईश्वरी गणेश बेलपत्रे – पिंपरी बु केंद्रामध्ये – प्रथम क्रमांक, अनय नवनाथ माने – पिंपरी बु केंद्रामध्ये – तृतीय क्रमांक, सिध्दी दत्तात्रय डिसले – पिंपरी बु – केंद्रामध्ये – तिसरा क्रमांक, सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे डिसलेवस्ती (गिरवी) शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना वार्षिक निकाल पत्रकाचे वाटप दिलीप बागल सर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दिलीप बागल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button