मस्साजोग येथील मुस्लिम बांधवांनी केली नाही रमजान ईद साजरी…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील मुस्लिम बांधवांनी फक्त ईद उल फित्र ची नमाज अदा करत आपल्या गावच्या सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सबंध गावावर शोककळा पसरली असल्यामुळे ईद साजरी केली नाही अशी माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…
अगदी लहान लेकरांना देखील नवे कपडे घेतले नाहीत,ईद निमित्तची नमाज अदा केल्यानंतर लहानथोरांसह त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेत सांत्वन केलं…
प्रत्येक पवित्र रमजान ईद निमित्त शुभेच्छा देणारा त्यांचा लाडका सरपंच यावर्षी त्यांना शुभेच्छा द्यायला या जगातच नाही याचं दुःख सगळ्या मुस्लीम बांधवांना होतं,भेट घेतेवेळी अलिंगन देताना मुस्लिम बांधवांनी माणुसकी खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे…

मोठ्या प्रेमाने ईद निमित्त शिरखुर्मा सरपंचांना भरवणाऱ्या हातांनी आज दुःखाच्या अश्रूंनी सांत्वन केलं,हे प्रेम, आपुलकी अन् माणुसकी पाहून माझ्यासारख्याचे मन सुन्न झालं अन् नकळत डोळे भरून आले…
मुस्लिम समाजाचे मनापासून खूप खूप आभार अन् करावं तेवढं कौतुक कमीच आहे,अनेक मुस्लिम बांधव यावेळी सरपंचांच्या आठवणींनी अक्षरशः गळ्यात पडून रडले,सरपंच त्या गावाला अन् गावकऱ्यांना किती प्रिय होते यातून दिसतं… हीच तर कमाई होती आदर्श सरपंच संतोष अण्णांची…



