सफाळे देवभूमी येथे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनसंवाद अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दल व सफाळे पोलीस ठाणे आणि ढवळे मेमोरियल ट्रस्ट रुग्णालय पालघर धर्मादाय लायन्स क्लब ऑफ सफाळे यांच्या संयुक्त विद्यमाने सफाळे आणि केळवे सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी सफाळे देवभूमी हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये नेत्र मोतीबिंदू, रक्तदाब, डायबिटीस, जनरल मेडिसिन, होमिओपॅथिक, इसीजी तपासणी करण्यासाठी सफाळे पोलीस ठाणे आणि केळवा सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच ठाणे अमलदारांसह पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

या यावेळी या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी, सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, लायन्स क्लब सफाळे अध्यक्ष विकास वर्तक, पालघर ढवळे मेमोरियल ट्रस्टचे डॉक्टर जितेश ठाकूर, डॉक्टर मिलिंद रणदिवे, सफाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश म्हात्रे, बहुजन विकास आघाडीचे सफाळे भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रांजल वर्तक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



