महाराष्ट्र

अकलूजच्या मार्केट यार्ड येथील “हॉटेल शिवरत्न” ला मदनसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील दिली सदिच्छा भेट…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नुकतेच सुरू केलेले “हॉटेल शिवरत्न” या फर्मला सभापती मदनसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली…

या भेटी प्रसंगी “हॉटेल शिवरत्न” येथे सोलापूचा प्रसिद्ध असलेला “दालचा खाना” तसेच गरम गरम पुरी भाजीचा आस्वाद आलेल्या नेते मंडळींनी घेतला,सदरच्या अल्पोपहार विषयीची संपुर्ण माहिती “हॉटेल शिवरत्न” चे चालक मालक असलेले इम्रान आणि राजूभाई मोतीलाल (MM) यांनी आलेल्या मान्यवरांना दिली…

सभापती मदनसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी “हॉटेल शिवरत्न” च्या भरभराटी साठी M M परिवाराला शुभेच्छा दिल्या,या वेळी अकलूज येथील प्रसिद्ध असलेल्या अश्विनी हॉस्पिटल चे डॉ एम के इनामदार साहेब आणि राजेंद्र काकडे साहेब आवर्जुन उपस्थित होते…

या वेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शेतकरी,व्यापारी आणि कर्मचारी वर्ग यांच्या सह M M परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button