MHT CET च्या परिक्षेत अकलूज च्या कृष्णा पवार ने मिळवले घवघवित यश…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
अकलूज येथील रहिवाशी असलेले आणि सध्या आफ्रिका खंडातील युगांडा येथे नोकरीस असलेले मनोजकुमार पवार साहेब यांचा मुलगा कृष्णा पवार याने नुकत्याच झालेल्या MHT CET च्या परिक्षेत 86 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले…
कृष्णा पवार ने मिळवलेल्या यशाने समाजातील सर्व घटकांतुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे…
टाइम्स 9 चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्याशी युगांडा येथून भ्रमणध्वनी वरून बोलताना मनोजकुमार पवार म्हणाले की,कृष्णा च्या पुढील शिक्षणासाठी त्याने जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि त्याच्या पुढील शिक्षणासाठी आमच्या हि शुभेच्छा असतील असे सांगितले…

कृष्णा पवार याने मिळवलेल्या यशाने मनोजकुमार पवार,राजेंद्र नागणे,गणेश घाडगे (निमगाव के) आणि आमीर मोहोळकर यांच्या कुटुंबात आनंद व्यक्त करण्यात आला…



