शहर

सफाळे जलसार विराथनबुद्रुक हद्दीतील पुरातन काळातील 500 वर्षांपूर्वीचे मेघराज मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेला असलेल्या जलसार विराथन बुद्रुक हद्दीतील पर्यटन स्थान प्राप्त झालेले 500 वर्षांपूर्वीचे पुरातन काळातील मेघराज मंदिर बुलेट ट्रेनच्या भू-सुरुंग स्फोटामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहे यामुळे या भागातील स्थानिक नागरिकाकडून एल अँड टी कंपनीच्या विरोधात तीव्र संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत .

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उभारण्यासाठी जलसार, विराथन बुद्रुक, टेंभीखोडावे, किरईपाडा या गावांच्या हद्दीत असलेल्या मेघराज डोंगराच्या आतून बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून यासाठी क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या भू- सुरुंग स्फोटाचा वापर केला जात असल्यामुळे मेघराज डोंगराच्या वर तीन हजार फूट उंचावर पाचशे वर्षांपूर्वीच्या पुरातन काळातील मेघराज मंदिराच्या भिंतींना व आतील देवस्थान मूर्तींना तडा जाऊन हे मंदिर सध्या पडण्याच्या मार्गावर आले आहे.या मंदिराला 2013 रोजी पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला असून पालघर जिल्हा परिषदे कडून या मंदिराकडे जाण्यासाठी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

असे असताना देखील हा बुलेट ट्रेन प्रकल्प जलद गतीने उभारणीसाठी हा बोगदा लवकर तयार व्हावा याकरिता एल अँड टी कंपनीचे अधिकारी आपला मनमानी कारभार करून क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या भुसृंगस्फोटाचा वापर करत असल्यामुळे या मंदिराची झालेली दयनीय अवस्था आणि कालांतराने हे पुरातन मंदिर नामशेष होईल या भीतीमुळे या भागातील नागरिकांकडून या प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button