चित्रपट रसिक प्रतीक्षा करत असलेला “अहम ” हा चित्रपट 9 जूनलाच रिलीज होणार — निर्माता योगेश घोलप !..

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
वडार समाजातल्या काही समाज बांधवानी” अहम ” चिञपटा बाबत गैरसमज करुन अचानक केलेल्या आंदोलनाच्या पविञ्या मुळे दि.12 मे 2023 रोजी रिलीज होणारा ” अहम “मराठी चित्रपट रिलीज झाला नाही परंतु आता हा चिञपठ दि.9 जुन 2023 रिलीज होणार आसल्याचे चिञपट निर्माते योगेश घोलप यांनी सांगितले 12 मे पासून चिञपट रसिकांना उत्सुकता लागून राहिली होती ती प्रतिक्षा आता संपली आहे
तसेच आंदोलन न मिटल्याने आणि थिएटर वर दगडफेक करणार असल्याचा इशारा वडार समाजाने दिल्याने थिएटर मालक चिञपट गृहात चित्रपट दाखवण्यास तयार नव्हते त्यामुळे चिञपट रिलीज ची तारीख फायनल होत नव्हती परंतु चिञपट निर्माता योगेश घोलप यांनी सर्वप्रथम आंदोलन कर्त्यांना त्यांच्या अटी मान्य करण्या तयारी दर्शवली तरीदेखील आंदोलन नाही मिटल्यास यांनी लीगल थिएटरला पोलीस संरक्षण घेणार असल्याचे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना योगेश घोलप यांनी सांगितले या संदर्भात कितीही अडचणी आल्या तरीही “अहम” चिञपट हा 9 जून 2023 लाच रिलीज होणार असल्याचे योगेश घोलप सांगितले.



