शहर

जिंती येथील शेतकरी अकबर गुलाब पठाण यांची बनावट दस्त करून घोर फसवणूक करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौकशीची मागणीन्याय न मिळाल्यास दिला 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्यातील जिंती येथील शेतकरी अकबर गुलाब पठाण यांच्या मौजे जिंती येथील गट नंबर 276/3 /अ जामीन क्षेत्र हे संगणमत करून तसेच फसवणूक करून खोटे बनावट तयार करून विश्वासात न घेता घोर फसवणूक करून खरेदी खत ज्यादा क्षेत्राचे दाखवून पठाण यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी दस्तूर खुद्द अकबर पठाण यांनी राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

निवेदनात श्री पठाण यांनी पुढे असे म्हटले आहे की मी मोजे जिंती येथील कायमचा रहिवासी असून शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो माझी आई गौसबी गुलाब पठाण हिचे नावे मौजे जिंती येथे गट नंबर 276/3/ अ ही जमीन होती माझी आई गोजबी गुलाब पठाण ही दिनांक 1/07/2008 रोजी मयत झाल्याने तिचे मुस्लिम धर्माप्रमाणे कायदेशीर वारस म्हणून मी अकबर गुलाब पठाण व माझा भाऊ सिकंदर गुलाब पठाण, बहीण मुमताज अहमद पठाण, शमा मोहम्मद अली शेख, रजिया आजम बेग, यांची महसूल दप्तरी 7/12 पत्रकी क्षेत्र 02 हेक्टर 70 आर यास समाईका मध्ये मध्ये वारसा हक्काची नोंद झालेली होती सदरची जमीन मोजे जिंती येथील गट नंबर 276/3 ही मिळकत फॉरेस्ट ची असून शासनाकडून कसून खाण्यासाठी मिळालेले असून तबदील न करण्याचे अटीवर दिलेली अविभाज्य नियंत्रित सत्ता प्रकार वर्ग 02 ची आहे याची माहिती व जाणीव वरील लोकांना असताना देखील बनावट खोटे लबाडीचे दप्तर करून माझी व शासनाची फसवणूक केलेली आहे तसेच मौजे जिंती येथील गट नंबर 276 ऑब्लिक तीन ऑब्लिक अ क्षेत्र झिरो दोन हेक्टर 70 आर या मिळकतीमध्ये समयकात गौसबी पठाण यांचे कायदेशीर वारस यांना मुस्लिम कायद्याप्रमाणे मुले अकबर व सिकंदर यांना 2/7 प्रत्येकी म्हणजेच 28.57% तर मुली मुमताज शमा व रजिया यांना 1/7 प्रत्येकी म्हणजेच 14.29% प्रत्येकी हिस्सा येतो वास्तविक गट नंबर 276/3/ अ पैकी क्षेत्र 02 हेक्टर 70 आर या मिळकतीमध्ये शिकंदर यास क्षेत्र 00 हेक्टर 78 आर अकबर या क्षेत्र 00 हेक्टर 78 आर तर मुली रजिया हिस क्षेत्र 00 हेक्टर 38 आर मुमताज हिस 00 हेक्टर 38 आर तर शमा हिला क्षेत्र 00 हेक्टर 38 आर एवढा हिस्सा व हक्क होता व आहे सदर मिळकत क्षेत्र 02 हेक्टर 70 आर पैकी सिकंदर याचा वारसा हक्काने आलेला 2/7 म्हणजेच 00 हेक्टर 78 आर व शमा हिचा 1/7 म्हणजेच 00 हेक्टर 38 आर क्षेत्र हे शिकंदर व शमा यांनी अकबर यांचे विषयात व हक्कात कायमचे सोडून देऊन तसा नोंदणीकृत हक्क सोड दस्त दुय्यक निबंध कार्यालय करमाळा येथे दिनांक 18/ 9 /2021 रोजी रजिस्टर नोंद नंबर 4183/ 2021 नुसार नोंदवून दिलेला होता व आहे वास्तविक मुमताज अहमद पठाण हिला वारसा हक्काने मुस्लिम कायद्याप्रमाणे गट नंबर 276/3/ अ मध्ये 00 हेक्टर 38 आर क्षेत्र हिस्सा येत होता व आहे मुमताज पठाण या मयत झाल्याने त्यांचे कायदेशीर वारस म्हणून मुले जहांगीर शब्बीर सलीम व मुलगी आशा यांची वारसा हक्काने नोंद झालेली होती सदर मिळकतीचे वाटप सरस धीरसमानाने झालेले नव्हते व नाही सदर मिळकतीमध्ये मुमताज हिचा हिस्सा मुले जहांगीर शब्बीर व सलीम व मुलगी आशा यांना 00 हेक्टर 38 आर येत होता याची माहिती व जाणीव होती तरीदेखील वरील प्रमाणे वस्तुस्थिती खरी असताना जहांगीर अहमद पठाण शब्बीर अहमद पठाण सलीम अहमद पठाण व आशा राजू मुलांनी यांनी दत्तात्रेय महाळू गायकवाड सिकंदर ताजुद्दीन मुलाणी व बलभीम सदाशिव पोटे यांनी संगणमत करून खोटे बनावट दस्त तयार करून त्यावर सह्या व अंगठे करून मौजे जिंती येथील गट नंबर 276 /3/अ पैकी 01 हेक्टर 80 आर या मिळकतीचे साठेखत मेहरबान दुय्यम निबंधक कार्यालय करमाळा येथे दस्त नंबर 1729 / 2023 नुसार दिनांक 11/ 4/ 2023 रोजी नोंदवून माजी घोर फसवणूक केलेली आहे सदरचे बेकायदेशीर बनावट खोट्यात लबाडीच्या साठी खतावरून सक्षम अधिकारी यांची परवानगी कामी अर्ज केलेला आहे सदरचे बेकायदेशीर बनावट साठे खताचे आधारे मला व माझे कुटुंबीयांना वरील लोक हे रात्री जीवे मारण्याची धमकी देऊन कब्जा घेण्याचे विचारात असून तशी भाषा करून जहांगीर शब्बीर सलीम व इतर लोक हे शिवीगाळ व दमदाटी करतात असे निवेदनात म्हटले आहे तरी वरील लोकांची त्यांनी केलेल्या खोटा लबाडीचे दस्त सह्या करून त्यांचे हिश्या पेक्षा ज्यादा क्षेत्राची साठे खत लिहून देऊन फसवणूक करून मला व माझे कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन शिवीगाळ करून दमदाटी करत माझी फसवणूक केलेली असल्याने संबंधित मा दुय्यम निबंधक करमाळा, बॉण्ड रायटर व इतर कट कारस्थान करून माझी कुटुंबास धमकी देणारे लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईचा करावी व मला न्याय द्यावा अशी मागणी शेवटी अकबर पठाण यांनी केली आहे

निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी जिल्हा पोलीस प्रमुख ग्रामीण सोलापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा, जिल्हाधिकारी सोलापूर, मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर, अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी माढा उपविभाग कुर्डूवाडी, तहसीलदार करमाळा, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, आमदार रणजितसिंह पाटील, विरोधी पक्ष नेते माननीय अजित दादा पवार यांच्याकडे पाठविण्यात आले आहे


मला न्याय न मिळाल्यास वेळप्रसंगी आत्मदहन करणार,,,,,,, अकबर पठाण

माझ्या जमिनीबाबत खोटे बनावट दस्त तयार करून माझी फसवणूक झाली असून जहांगीर पठाण, शब्बीर पठाण, सलीम पठाण, आशा मुलानी, दत्तात्रेय गायकवाड, सिकंदर मुलानी व बलभीम पोटे यांनी संगणमत करून माझी घोर फसवणूक केली असून मला त्वरित न्याय मिळावा अन्यथा येत्या 15 ऑगस्ट 2023 रोजी मी माझ्या कुटुंबासहित करमाळा तहसील कार्यालय समोर आत्मदहन करणार असल्याचे अकबर पठाण यांनी बोलताना सांगितले याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यालयावर राहील असेही ते बोलताना म्हणाले

मागील काही दिवसापूर्वी करमाळा तालुक्यातील मूर्तीचे मुरकुटे येथील नासिर पठाण नामक एका शेतकऱ्याला खाजगी सावकाराने वेळोवेळी त्रास दिल्यामुळे सावकाराच्या जाचाला कंटाळून अखेर त्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली होती तेव्हा संबंधित कार्यालयाने याची गंभीरतेने दखल घेऊन वेळीच जिंती येथील शेतकऱ्याला न्याय द्यावा अन्यथा वरकुटे मूर्तीचे येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता संबंधित कार्यालयाने घ्यावी अशी चर्चा शेतकरी वर्ग मधून होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button