माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील विजय होताच जेऊर येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे अधिकृत उमेदवार माननीय धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदार संघामधून प्रचंड मताधिक्याने विजयी होताच त्यांच्या जेऊर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला
माढा लोकसभा मतदार संघाचे विजयाचे शिल्पकार माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्या सहित मुक्त गुलालाची उधळण करीत तसेच पेढे वाटून आपला जल्लोष साजरा केला यावेळी जेऊर ग्रामपंचायतीचे सरपंच पैलवान पृथ्वीराज पाटील सहित त्यांचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माढा लोकसभा मतदारसंघातून माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यामध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा सिंहाचा वाटा होता आबा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण करमाळा तालुका पिंजून काढला होता शेवटी करमाळा तालुक्यातील असंख्य मतदार बांधवांनी धैर्यशील मोहिते पाटील तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यावर विश्वास टाकून माढा लोकसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्य देत मोहिते पाटील यांना 1 लाख 24 हजार 516 अशा मताधिक्याने लीड देत विजयी केले यामध्ये करमाळा तालुक्यातील मतदाराचाही मोठा सिंहाचा वाटा आहे