नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचा जल्लोष दयावान प्रतिष्ठान ने केला साजरा…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी, टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज…
अगदी सुरुवाती पासूनच धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या विजयी जल्लोषाची तयारी जसे माढा लोकसभा मतदार संघातील जनता करीत होते अगदी तशीच तयारी अकलूज च्या दयावान प्रतिष्ठान चे निष्ठावंत कार्यकर्ते हि करत होते…
माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काही वर्षापूर्वी स्थापन केलेली दयावान प्रतिष्ठान हि सामाजिक संस्था,या संस्थेचे जाळे इतक्या झपाट्याने वाढत गेले की सामाजिक आणि राजकीय कामे करत असताना अनेक युवक या संस्थेशी जोडले गेले अन् ते कायमचेच कट्टर मोहिते पाटील समर्थक हि ठरले…
माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या उमेदवारी पासुन प्रचार यंत्रणा असो किंवा निवडणूकी संदर्भात कुठलेही काम असो दयावान प्रतिष्ठान च्या सर्वच कार्यकर्त्यांनी अहोरात्र झटत आपल्या कामाची चुणूक दाखवली…
या निवडणुकीचा परिणाम काय असणार आहे हे दयावान प्रतिष्ठान चे कार्यकर्ते हेरून होते आणि त्यांनी तशी तयारी 4 जून च्या पूर्वीच करून ठेवली होती,सबंध अकलूज शहरात जवळ जवळ 25 ते 30 डिजिटल फ्लेक्स,अनेक प्रकारच्या मिठाई ची ऑर्डर देऊन दयावान प्रतिष्ठान चे कार्यकर्ते अगदी जोमातच होते…
नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना पुढील राजकीय कारकिर्दीस टाईम्स 9 मराठी न्युज समुहाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा…