शैक्षणिक
‘नीट'(NEET) च्या परीक्षेत कु.हर्ष नारायण पाटील पालघर जिल्ह्यात अव्वल
(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड शहरातील पाटीलपाडा येथील मूळ रहिवासी पण सध्यस्थितीत झडपोली येथे वास्तव्यास असणाऱ्या सौ नम्रता व श्री नारायण पाटील ( बांगर ) यांचा मुलगा कुमार हर्ष नारायण पाटील याने मेडिकल च्या प्रवेशासाठी असणाऱ्या आणि अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत 720 गुणांपैकी 686 गुण मिळवत देशात बाजी मारली.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी पालकांकडून लाखो रुपये खर्च करून मुलांसाठी मोठ्या शहरांमध्ये क्लासेस लावले जातात पण हर्ष ने मात्र या परीक्षेसाठी स्वतःच तयारी केली होती. विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्याचा झेंडा देशात रोवल्याने हर्ष चे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.