महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या भाजपा ला सक्षम नेतृत्वाची गरज…मी पुन्हा येईन ते मला मोकळे करा…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

मी पुन्हा येईन ते मला मोकळे करा असा सगळा प्रवास महाराष्ट्रातील जनतेने बघितला आहे,उगाच बाकी चे राजकीय स्टंट करुन फडणवीस यांनी वेळ वाया घालवू नये,महाराष्ट्रातील जनता सोडाच आता BJP वाल्यांनी हि यांना अडवू नये…

महाराष्ट्राची राजकीय सभ्यता वेशीवर टांगलेला माणूस आहे हा,शिवसेना फोडली तिथं पर्यंत ठिक होते परंतु शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडल्या नंतर जनतेच्या सहनशिलतेचा बांध फुटला आणि काय निकाल लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिला…

उबाठा शिवसेना चे संजय राऊत यांनी फडणवीस यांचा उल्लेख “भामटा” माणूस म्हणुन केला याचे कारण टीम फडणविस असु शकते,फडणवीस यांच्या टीम मध्ये तर अशी लोकं होती की त्या लोकांना जनतेच्या अपेक्षा शी काही देणं घेणं नव्हते,चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर तर पवार कुटुबांवर सोडलेलेच होते,किरीट सोमय्या कागद,चीटोऱ्या गोळा करण्यात व्यस्त होते,मोहित कंबोज आणि श्रीकांत भारतीय हे तर वेगळ्याच तोऱ्यात पहायला मिळाले,निलेश राणे मुस्लीम विरोधी कारवाया साठी आणि चित्रा वाघ,गिरीश महाजन (संकट मोचक),बावनकुळे हे मात्र 400 पार शिवाय काही बोलायला तयार नव्हते…असो…

दोन दोन पक्ष फोडून देखील फडणविस हे सत्तेचा इतका “हावरट” पणा करत होते की महाराष्ट्रातील जनतेला शेवटी शेवटी असे वाटू लागले की “भिख नको पण कुत्र आवर”…इथे कोण येणार कोण जाणार हे जनता ठरवत असते त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना “सक्षम” आहे परंतु फडणविस यांनी जनतेला आणि घटनेला गृहीत धरलेच नसल्यामुळे जनतेने त्यांचाच निकाल लावला…

महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून मराठा समाजाच्या प्रती आंतरवाली सराटी येथे घेतलेली भूमिका हि फडणविस यांना नडलीच…महाराष्ट्राच्या अनेक लोकसभा मतदार संघात तर फडणवीस यांनी संघाच्या कार्यकर्त्यांच्या रिपोर्ट्स वर वेगवेगळे उमेदवार लादले हि गोष्ट च स्थानिक जनतेला रुजली नाही,संघ कार्यकर्ते आणि भाजपा चे कार्यकर्ते यांच्या मुळेही काही जागांचे नुकसान झाले हे कुणीही नाकारू शकत नाही…

ED,CBI सारख्या संस्था हाताशी धरून फडणवीस यांनी सत्तेची फक्त चेष्टा केली पण जनतेच्या विकासाबद्दल एक चकार शब्द ही कधी काढला नाही हे इथे विशेष नमूद करण्यासारखे…भाजपा चे कार्यकर्ते तर नरेंद्र मोदी हे सत्तेचा “ताम्रपट” घेऊन जन्माला आले अशा मनःस्थितीत निवडणुकीला सामोरे जात होते…

आणखी एक म्हणजे बरेच झाले उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात तो कोरोना आला तोच कोरोना फडणवीस ज्या वेळी पुन्हा आले त्या वेळी जर आला असता तर ह्यांनी काय केले असते आणि महाराष्ट्राचे काय झाले असते हे विचारायलाच नको…

लोकसभा हि विधानसभेची नांदी आहे हे न समजण्या पलीकडे भाजपा वाले भोळे हि नाहीत महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकी साठी भाजपा ला सक्षम नेतृत्वाची गरज आहे (फडणविस यांना सोडून) हे मात्र तितकेच खरे…
तुर्तास इतकेच…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button