महाराष्ट्र
अकलूजमधील चालू असलेले कॅफे तात्काळ बंद करा- साईराज अडगळे …अन्यथा महाराष्ट्र विकास युवा सेनेचा डी वाय एस पी ऑफिस वर मोर्चा
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
सांगली मध्ये असलेल्या कॅफे मध्ये अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देवून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून अशाच प्रकारे अकलूजमधील कॅफे मध्ये प्रकार घडण्याची शक्यता असून कॅफेच्या नावाखाली अनेक अवैद्य प्रकार घडत आहेत.
तरुण तरुणी,विद्यार्थी, विध्यार्थीनी वाईट मार्गाला लागले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे अकलूजमधील असलेले कॅफे तात्काळ बंद करण्यात यावेत या मागणीचे निवेदन डी वाय एस पी साहेब यांना देण्यात आले
यावेळी जिल्हा संघटक साईराज अडगळे, तालुका अध्यक्ष आदित्य काकडे, तालुका संघटक विशाल लोखंडे, अकलूज शहर संघटक चेतन साठे, निमगाव शाखेचे संघटक रोहन साठे,पिलीव चे तुषार करडे इत्यादी उपस्थित होते.