400 पार म्हणणारे झाले पसार…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
अब की बार 400 पार म्हणणारे आता “पसार” झाले आहेत,फडणविस यांची विधानसभेला हि गंम्मत होणार आहे कारण जनतेच्या मनातून एखादा नेता उतरला की तो “पुन्हा येईन” की नाही याची गॅरंटी नसते…
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना याच्या सारखा खुनशी स्वभाव कुणाचाच असु नये कारण आपण ते काम फक्त समाजाच्या हितासाठी करत असतो,त्यात वैयक्तिक दोष कुणाला द्यायचा हि नसतो…
मी पुन्हा येईन असे फडणवीस यांनी म्हंटले होते परंतु ते आले नाहीत आणि पुन्हा आले तर दोन दोन पक्ष फोडून आले,बर ठिक आहे आले पण ते आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा राज्यातल्या जनते साठी म्हणा काय केले…? या प्रश्नाचे उत्तर यांनी अगोदर द्यावे,गेली अडीच वर्ष ह्या माणसाने अतिशय घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात केले आहे…
फडणवीस यांनी आता मला मोकळे करा अशी जी भाषा केली आहे ना ती कमीत कमी विधानसभे पर्यंत करूच नये…
कारण पवार साहेबांनी “मारलेल हे सुजल्यावरच दिसत” हे अजुन एकदा यांना बघु द्या,उगाच भाजपा वाल्यांनी हि यांचा राजीनामा घेण्याची घाई करू नये… पवार साहेबांचां औरा संपला असे हेच म्हणत होते आणि त्याच पवार साहेबांनी याच्या नाकात दम येऊ पर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात पळवले यांना…
आंतरवाली सराटी च्या वेळी त्या निष्पाप लोकांवर लाठीचार्ज चे आदेश कुणाच्या ऑर्डर ने आले याचा हि जाब येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घेतल्या शिवाय महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही हे हि तितकेच खरे…
ED,CBI सारख्या संस्था हाताशी धरुन अनेक लोकांच्या संसाराचे वाटूळे करणारे फडणविस आज दिल्ली येथे जाऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जनतेची सहानुभूती अशी मिळत नसते,भाजपा च्या 105 आमदांराशी एकदा खुलेआम चर्चा करा ते आमदार हि फडणवीस यांचे नेतृत्व सध्या तरी मान्य करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे हि तितकेच खरे…