सोलापूर च्या बागबान जमीयत चॅरिटेबल ट्रस्ट ने हि दिला 400 पार चा नारा…यंदाच्या वधू वर मेळाव्यात 400 लग्न जुळवण्याचा केला निर्धार पक्का…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
सोलापूर येथील बागबान जमीयत चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे यंदाच्या वर्षी हि भव्य अशा वधू वर परिचय मेळाव्याची घोषणा करण्यात आली असुन ट्रस्ट ने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रा सह शेजारील कर्नाटक राज्यातील मुस्लिम समाजातील सर्व घटकांसाठी सोयी चे म्हणुन सोलापूर येथे वधू वर परिचय मेळावा घेण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली,अशी माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष नजाकतअली मंद्रूपकर यांनी टाइम्स 9 चे अकलूज शहर प्रतिनिधी,आमीर मोहोळकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलताना दिली…
पुढे बोलताना ते असे म्हणाले की मुस्लिम समाजातील बागवान,शेख,मोमीन,नदाफ,खान,अत्तार,तांबोळी,मुल्ला,मुजावर,मुलाणी,कुरेशी आदी घटकांनी वधू वर मेळाव्याचा लाभ घ्यावा तसेच मुस्लिम समाजातील तलाक शुदा आणि विधवा महिलांच्या जबाबदार व्यक्तींनी देखील यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले…
गेल्या वर्षी झालेल्या वधू वर मेळाव्याला लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता बागवान जमियत चॅरीटेबल ट्रस्ट ने यंदा च्या वर्षी 400 वधू वरांचे लग्न जुळवण्याचा निर्धार केल्याचे हि नजाकत अली मंद्रूपकर यांनी सांगितले…
सदर च्या वधू वर मेळाव्या मध्ये ज्या वधू वरांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांच्या साठी 200/ रू रजिस्टर फि असेल,आपले नाव रजिस्टर करते वेळी 4 बाय 6 चे दोन कलर फोटो,दोन बायोडेटा झेरॉक्स आणि दोन आधार कार्ड झेरॉक्स आणणे जरुरी आहे आणि नांव नोंद करण्याची अंतिम तारीख 25 जून राहील…
बागबान जमियत चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित हा मेळावा रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी के एम् सी गार्डन,सोशल हायस्कूल समोर,किडवाई चौक सोलापूर येथे होणार असुन सकाळी दहा वाजले पासुन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वधू वर परिचयाचे कामकाज सुरू राहणार आहे…
आपले नांव खालील पत्त्यावर रजिस्टर करावे…
नजाकतअली मंद्रूपकर 423, जोडभावी पेठ,मंगळवार बाजार,जिनतुल इस्लाम मशिद च्या जवळ,सोलापूर
मोबाइल नंबर 9922357053
टिप :- दुपारच्या जेवणाची सोय ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे…