महाराष्ट्र

खून पिला कर जो शेर पाला था उसने सर्कस में नौकरी कर ली…!

आमीर मोहोळकर
अकलूज शहर प्रतिनिधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मोबाइल नंबर 9890299499

भारतीय लोकशाहीचा उत्सव आता जवळ जवळ संपत आला असुन देशामध्ये आत्ता पर्यंत 5 टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आणि उद्या शनिवारी 6 वा टप्पा पार पडेल,यानंतर 7 वा आणि 4 जून ला 19 व्या लोकसभेची अखंड मत मोजणी प्रक्रिया होणार आहे…

हे सांगायचे तात्पर्य म्हणजे या सर्व घडामोडी नंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आणि आज च्या घडीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या बाबतीत आघाडी घेतली असुन कोणत्याही परिस्थिती मध्ये जास्तीत जास्त जागा ह्या महाविकास आघाडीतून मिळवणारच असा घाटच शरद पवार यांनी घातला आहे…

शरद पवार यांनी असे करणे हि साहजिकच आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी अगदी समझदारी ची भुमिका निभावत महाविकास आघाडीला जबरदस्त अशी सहानुभूती मिळवून देण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे…

परंतु ह्या सर्व बाबतीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींना ज्या वेळी वेग येईल त्या वेळी एका गोष्टीची अडचण जरूर येईल ती म्हणजे अजित पवार यांचीच त्याचे कारण असे हि असु शकेल की “अजित पवार” हे भाजपाच्या वळचळणीला गेल्या नंतर ते देखील महायुतीतून आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि शरद पवार यांची खरी डोकेदुखी इथून सुरू होईल आणि एक नवे “महाभारत” महाराष्ट्रात नक्कीच घडेल एवढे मात्र तितकेच खरे…

चाणाक्ष शरद पवार यांना बारामती,सातारा,अ नगर सह माढा लोकसभा मतदार संघातील स्वपक्षाच्या उमेदवारांच्या विजयाची चाहूल लागल्याने भविष्यात बारामती विधानसभा मतदार संघात हि युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे अनेक राजकीय धुरंदर हि कोड्यात पडलेली आहेत…

या सर्व घडामोडी आठवत असताना मला फहीम बदायुनी यांचा एक शेर मात्र जरूर आठवला तो असा की,”खून पीला कर जो शेर पाला था उसने सर्कस में नौकरी कर ली” आणि हे काही बाबतीत खरे हि ठरू शकते कारण फुले शाहु आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांना बाजूला सारत जातीवादाचे बीजे पेरणाऱ्या भाजपा सारख्या पक्षाशी हात मिळवणी करुन अजित पवार यांनी स्वतःचीच चेष्टा करुन घेतली आहे…

शेवटी “घर का भेदी हि लंका ढाता है” हे मात्र नाकारून चालणारच नाही…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button