महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कन्हेरे व भगत यांचा माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते होणार सेवापूर्ती निमित्त सत्कार

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

जि. प. शाळेचे शिक्षक कन्हेरे व भगत यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षकांचे सत्कार होणार आहेत. यावेळी तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी व शिक्षण विभागातील अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रदीर्घ काळ सेवा केल्यानंतर जि प शाळा कुंभेज येथील विकास सुखदेव कन्हेरे व जि प शाळा लव्हे येथील हनूमंत अंबादास भगत हे दोन शिक्षक दिनांक 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यांना निरोप देण्यासाठी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी माजी आमदार नारायण पाटील हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी हा कार्यक्रम घेण्यात येणार असून कुंभेज फाटा येथील विठ्ठल मंगलकार्यालयात या भव्य कार्यक्रम सकाळी 11:30 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सभापती अतूल पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे, केम मा सरपंच अजित तळेकर, मा सभापती शेखर गाडे, गणेश करे-पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जून सरक, पोलीस अधिकारी विश्वास कन्हेरे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, गट शिक्षण अधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, अनिल बदे, भारत पांडव, लक्षमण भंडारे, अजिनाथ तोरमल,

बाळासाहेब गोरे, प्रताप काळे, हनूमंत सरडे, सुनील कदम, हनूमंत सोनवणे, चंद्रहास घोरमले, अजिनाथ देवकाते, किसन कांबळे, शिवाजी कामटे, सुरेश शिंदे, चैतन्य गायकवाड, गणेश कादगे, राजाराम सरक, अंजना निमगिरे, प्रकाश मंगवडे, अशोक गवेकर, देविदास खोडके, अरुण चौगुले आदिसह राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

या भव्य सत्कार समारंभाची तयारी सुरु झाली असून मान्यवरांना तसेच करमाळा तालुक्यातील शिक्षकांना निमंत्रण देण्याचे काम चालू आहे. या कार्यक्रमासाठी जेऊर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी हे नियोजन करत असून दि 27 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजता मोठ्या संख्येने नागरिक व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button