चलो “जिम्मेदारी” निभाते है…!लोकशाही को मजबुत बनाते है…!

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499
तसे पहायला गेल्यास दोनच अक्षरी नाव पण याच दोन अक्षरी नावाने दोन दोन पक्ष फोडणाऱ्या देवेंद्र फडणवीस याची पाक जिरवली आहे,तर मित्रांनो आपण बोलत आहोत दोन अक्षरी माढा लोकसभा मतदार संघा बाबत…
ज्या ज्या वेळी माढा लोकसभा मतदार संघाची निवडणुक जाहीर झाली त्या त्या वेळी या मतदार संघाने नविनच खासदार या मतदार संघा साठी दिला हे प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजे…
माढा,करमाळा,माळशिरस,सांगोला,फलटण,माण खटाव,पंढरपूर तालुक्यातील 42 गावे आणि कोरेगाव तालुक्यातील 17 गावे असे मिळुन तयार झालेला माढा लोकसभा मतदार संघ 2009 साली अमलात आला आणि सुरु झाला सत्तेचा सारीपाट…
या मतदार संघात सुरुवाती पासूनच “अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील यांचा शब्द प्रमाण मानला गेला आणि जनतेने हि एक हाती खासदार निवडून देत मोहिते पाटील यांच्या वर निष्ठा कायम राखली,आत्ता पर्यंत या मतदार संघाचे नेतृत्व राष्ट्रवादी चे कणखर नेते शरद पवार,स्वतः विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले…
याचा अर्थ असा की माढा लोकसभा मतदार संघाच्या आत्ता पर्यंत तीन निवडणुका झाल्या आणि ह्या तिन्ही निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या प्रभावामुळे तत्कालीन परिस्थीतीस वेगवेगळे तीन खासदार आपणांस पहायला मिळाले,रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सुध्दा मोहिते पाटील यांच्या वरद हस्ताने झालेले खासदार आपण सर्वांनी पाहिले…

आज मतदान होत असलेली माढा लोकसभेची हि चौथी निवडणुक आणि याच माढा लोकसभा मतदार संघात या वेळी एकुण 32 उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरले असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट व महाविकास आघाडी तर्फे धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीतुन भाजपा चे रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघा मध्येच खरा सामना होण्याची चिन्हें सध्या तरी दिसत आहेत…
गेल्या काही महिन्यांपासून शह काटशह,दावे प्रतिदावे करत हि लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आपण सर्व जण पाहत आहोत,गेल्या पंधरा वीस दिवसा पासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी संपली आहे,धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी दस्तुर खुद शरद पवार यांच्या पासुन ते सयाजीराजे मोहिते पाटील यांनी सहभाग घेतला तर भाजपा चे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जनतेचा विश्वास गमावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी,दोन दोन पक्ष फोडून समाधानी नसणारे देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले…
स्वतः ला किंगमेकर समजणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा बहुतांश वेळ तर माढा लोकसभा मतदार संघात खुन्नस काढण्यात च गेला,याचा परिणाम असा झाला की जनतेची पुर्ण सहानुभूती धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळाली आणि “तुतारी” वाजवणारा माणूस सर्व सामान्य जनतेने मना मनात पक्का केला…
एक गोष्ट मला प्रामुख्याने येथे सांगावीशी वाटते की,देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभेची निवडणूक दोन दोन पक्ष फोडल्या सारखी सहजतेने घेतली होती परंतु मोहिते पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्या सहित जनतेने हि निवडणुक हाता मध्ये घेतली हे विशेष…
गोपीचंद पडळकर,किरीट सोमय्या,निलेश राणे,मोहित कंबोज,बावनकुळे आणि आपल्या कुत्र्याचे नाव शंभु ठेवणारा श्रीकांत नावाचा भारतीय कुत्रा हे माढा मध्ये कुठेच दिसले नाही ते बरेच झाले नाहीतर माढा लोकसभा मतदार संघातील जनतेला 4 जून पर्यंत निकालाची वाट बघण्याची गरजच पडली नसती…
चंद्रकांत पाटील हे एकदाच माढा मध्ये आले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देता देता आऊट होऊन बॅक टू पव्हेलियन झाले,याचा अर्थ असा की माढाच्या जनतेने भाजपा च्या दडपशाहीला जुमानलेच नाही…
तसे पहायला गेलं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आता माढा लोकसभा मतदार संघाचे जुने खासदार झाले आणि आपल्या माढा लोकसभा मतदार संघाची तर रीतच अशी की प्रत्येक वेळेस नवाच खासदार…
चला तर मग दोन अक्षरी “माढा” मध्ये तीन अक्षरी “तुतारी” वाजवणाऱ्या माणसा समोरील बटण दाबून चार अक्षरी “धैर्यशील” मोहिते पाटील यांना चार अक्षरीच “खासदार” करूया…
आज छुट्टी का दिन नहीं “जिम्मेदारी” निभाने का दिन है…!लोकशाही को मजबुत बनाने का दिन है…!



