शहर

पालघर जिल्ह्यातील केळवे बीच पर्यटन महोत्सव 2025 एप्रिल 18 ते 20 रोजी साजरा होणार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध केळवे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी दरवर्षी केळवा बीच पर्यटन महोत्सव साजरा करण्यात येत असतो. या वर्षीदेखील हा महोत्सव केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाच्या माध्यमातून व ग्रामपंचायत केळवे यांच्या सहकार्याने 18 ते 20 एप्रिल 2025 रोजी हा 5 वा केळवे बीच पर्यटन महोत्सव तीन दिवस होणार आहे.

आतापर्यंतच्या झालेल्या महोत्सवात प्रतिवर्षी कार्पोरेट, सेमी कॉर्पोरेट, स्थानिक मच्छीमार,वाडवळ, आगरी, भंडारी, मुस्लिम,आदिवासी, समाजातल्या महिलांकडून विविध प्रकारचे पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कार्पोरेट व सेमी कॉर्पोरेट विभागाचे 100 हून अधिक स्टॉल्स मोठ्या प्रमाणात महोत्सवात मांडले जाणार आहेत.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील प्रमुख नृत्य प्रकार असलेले वारली नृत्य, विविध प्रांतातील नृत्य संगीत यांची मेजवानीसुद्धा आलेल्या पर्यटकांना आकर्षित करते. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात साधारण 15 ते 20 हजार पर्यटक भेट देतात.

या महोत्सवात मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवली, नाशिक, दीव, दमण, सिल्वासा आणि सुरत, वापी, उंबरगावपर्यंतचे पर्यटक भेट देऊन आनंद लुटतात. पालघर जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील नागरिकही मोठ्या संख्येने येतात. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पर्यटकांनी केळवे बीच महोत्सवाला भेट देऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संस्थेचे अध्यक्ष संजय घरत यांनी केले आहे.

महोत्सवाला पर्यटकांनी भेट देण्याच्या दृष्टीने एसटी बसची सुविधा सकाळी १० ते रात्री १० पर्यंत केळवा रोड स्टेशन ते केळवे आणि पालघर रेल्वे स्थानक ते केळवे रेल्वे स्थानकापर्यंत दिवसभर फेऱ्या सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button