महाराष्ट्र

करमाळा शहरातून महाविकास आघाडी च्या उमेदवाराला मोठे मताधिक्य देऊ.-सुनील बापू सावंत

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळा शहरातून मोठे मताधिक्य देऊ असे आव्हान सावंत गटाचे युवा नेते सुनील बापू सावंत यांनी काढले ते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सौभाग्यवती शितलताई मोहिते पाटील यांनी सावंत कार्यालयात भेट दिली यावेळी सावंत बोलत होते यावेळी संपूर्ण सावंत परिवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आले

यावेळी बोलताना सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत म्हणाले की ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून यावेळी भाजपच्या उमेदवाराला जनता मतपेटीच्या रूपाने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही भाजपची देशात हुकूमशाही वाढत चाललेली आहे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केलेली आहे शेतकरी कष्टकरी मजूर यांना गेल्या दहा वर्षात भाजप ने काय दिले यांचा अभ्यास करावा भाजपने फक्त भांडवलदाराला हाताशी धरून लोकशाही धोक्यात आणण्याचे काम केले आहे भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेत आहेत सध्या भाजपची पायाखालची वाळू घसरली असून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दम देऊन भीती घालून भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडत आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार हे कधीच करमाळ्यात सर्वसामान्य जनतेकडे फिरकलेच नाही त्यामुळे हीच एकमेव संधी मतदार राजांकडे आलेले आहे असे त्यावेळी म्हणाले

यावेळी शितलदेवी मोहिते पाटील म्हणाले की ही लढाई मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर अशी नसून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्याचे आव्हान यावेळी मोहिते पाटील यांनी केले

यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत नगरसेवक संजय सावंत माजी नगरसेवक फारूक जमादार रवींद्र कांबळे दीपक सुपेकर गोविंद किरवे अजीज तांबोळी साधनाताई मंडलिक विकास सोसायटीच्या चेअरमन मनोज गोडसे जयकुमार क्षीरसागर खलील मुलानी देवा लोंढे व्यापारी अशोक दोशी नागेश उबाळे, आदी शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button